हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपचे कमळ हातात घेतले आहे. पक्षात उद्या प्रवेश करण्याचा निर्णय साबळेंनी जाहीर करीत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. त्याला चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले. “साबणे यांचा व माझा संबंधच काय? त्यांच्या पक्षाबाबत त्यांनी बोलावं, मी काँग्रेसमध्ये आहे, असे चवहन यांनी म्हंटले आहार.
देगलूर बिलोली जागेसाठी इच्छुक असलेल्या मात्र, शिवसेनेत नाराज असलेल्या सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याबाबत आज माहितीही दिली. यावेळी साबनेनी “शिवसेनेत माझं कुणाशी वाकडं नव्हतं. अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यातल्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपण शिवसेना सोडतोय”, असा आरोप केला. त्यांच्या या आरोपाला मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला असून त्यामध्ये ते म्हणाले की, “साबनेनी अशोक चव्हाण यांच्या एकाधिकार शाहीला वैतागून शिवसेना सोडल्याचा आरोप केला आहे. तसेच चव्हाण यांच्याकडून शिवसेना संपवण्याचे काम केले जात आहे, असे साबणे म्हणत आहेत. वास्तविक पाहता त्यांचा आणि माझा संबंधच काय? त्यांच्या पक्षाबाबत त्यांनी बोलावं, मी काँग्रेसमध्ये आहे. साबणे मुळातच शिवसेनेचे आहेत. मी काँग्रेस पक्षामध्ये आहे. साबणे यांनी शिवसेनेच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी, असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.