औरंगाबाद । राज्यावर सध्या करोनाचं संकट आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, करोनाच्या संकटाशी दोन हात करत असताना राज्यासमोर एक नवं संकट उभं ठाकलं आहे. औरंगाबादमध्ये ‘सारी’चा (सिव्हीअरली अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) आजार पसरत आहे. या आजारामुळे औरंगाबादमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान २३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सर्वांवर औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राज्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढवणारी बाब म्हणजे ‘सारी’ आजाराची लक्षण करोना सारखीच आहेत. करोनाप्रमाणे सारी आजाराचीही सर्दी, खोकला ताप हीच लक्षणे आहेत. सारीच्या रुग्णाला सर्दी, ताप, खोकला यासोबत श्वास घेताना त्रास होतो. यामुळे ही लक्षणं दिसू लागल्यानंतर करोनाची लागण झाली तर नाही ना, याचीही खात्री डॉक्टरांकडून केली जात आहे. यामुळे सारीच्या रुग्णांचे करोनाच्या तपासणीप्रमाणे घशातील द्रव तपासणीसाठी घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये आतारपर्यंत १०३ जणांवर उपचार करण्यात आले आहेत. यामधील १० जणांचा मृत्यू झाला आहे. सारीच्या रुग्णांवर औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुर असताना सारी आजारामुळे त्यात भर पडू नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व खासगी आणि शासकीय रूग्णालयांना सारीच्या रूग्णांची माहिती नियमितपणे सादर करण्यास सांगितलं आहे.
महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधित संख्या 1297 झाली आहे. यामध्ये मुंबई 143, पुणे 03,पिंपरी चिंचवड 02, यवतमाळ 01, औरंगाबाद 03, ठाणे 01,नवी मुंबई 02, कल्याण-डोंबिवली 04,मीरा-भाईंदर 01,वसई विरार 01,सिंधुदुर्ग 01,अशी 162 रुग्णांची वाढ झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.
इतर महत्वाच्या बातम्या –
१५ एप्रिलपासून पुन्हा सुरु होऊ शकते रेल्वे, ४ तास अगोदर पोहोचावे लागणार स्टेशनवर#CoronaInMaharashtra #CoronaUpdatesInIndia #covidindia #COVID #HelloMaharashtra https://t.co/W8e07oQNrR
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 9, 2020
कोरोना आणि व्हायरस नावाची भानगड नक्की काय आहे ?@PawarSpeaks @rajeshtope11 @CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RRPSpeaks @RohitPawarOffic #HelloMaharashtra #CoronaInMaharashtra #CoronaWarriors https://t.co/1nwSdQC4jA
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 9, 2020
घाबरु नका, All is Well | कोरोनाशी लढून जिंकलेल्या ६ माणसांच्या जिद्दीची गोष्ट#CoronaUpdatesInIndia #CoronaInMaharashtra #CoronaWarriors #HelloMaharashtra https://t.co/yR3uCb2gtp
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 9, 2020