कोरोनाची लस आल्यानंतर सिरम इन्स्टिट्युट ‘या’ किंमतीला उपलब्ध करून देणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । संपूर्ण जग कोरोना महामारीने ग्रासलं आहे. कोरोनाच्या या संकटातून बाहेर पाडण्यासाठी एक एकमेव उपाय म्हणजे लस. त्यामुळं अनेक देशात कोरोनावरील लस शोधण्याचे प्रयन्त सुरु आहे. दरम्यान, पुण्यातली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने कोरोनाची लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ही लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारतातच नाही तर जगातल्या देशांमध्ये असलेल्या गरीबांना ही लस उपलब्ध करण्याचा भारताचा मानस आहे. त्या दृष्टीने आता पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने आणखी एक पाऊल उचललं आहे.

सिरम इन्स्टिट्युट २०२१ पर्यंत १०० दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लसीची जास्तीत जास्त किंमत ३ यूएस डॉलर्स म्हणजे साधारण २२५ ते २५० रुपयांच्या घरात असेल अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटने दिली आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. सिरम ही संस्था, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन करोना लसीसाठी १५० मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे. GAVI मार्फत निधी सिरम इन्स्टिट्युटला कोरोना लसीच्या उत्पादनसाठी दिला जाईल. असं

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment