वाईट वाटते, मला न्यय…!! कोरोनावर उपचार घेताना तडफडून मृत्यू पावलेल्या पत्रकार पांडुरंग रायकर यांचे शेवटचे शब्द..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यात टीव्ही 9 वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या पांडुरंग रायकर यांचं बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झालं. बुधवारी पहाटे १ वाजून ३३ मिनिटांनी त्यांनी whatsapp ग्रुपवर केलेला मेसेज चांगलाच व्हायरल होत असून कोरोना काळात प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या एका पत्रकाराला वेळेत उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागणं ही धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत … Read more

राज्यांना कोरोना सुरक्षा साधनांचा पुरवठा थांबवणं, याला जबाबदारी घेणं म्हणतं नाहीत- रोहित पवार

पुणे । गेले ५ महिने संपूर्ण भारतावर कोरोनाचं संकट आहे. याकाळात केंद्र सरकारकडून राज्यांना मदत केली जात होती. कोरोनावर लस उपलब्ध न झाल्यामुळे सोशल डिस्टन्शिंगबरोबरच मास्क वापरणं हा एकच उपाय होता. त्याचप्रमाणे आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी पीपीई किट अत्यावश्यक आहे. योग्य ती काळजी घेऊनही कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. असं असताना आता केंद्र सरकारने कोरोना सुरक्षा … Read more

“उध्दवा अजब तुझे सरकार!” दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राजू शेट्टी आक्रमक

पुणे । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काल बारामतीत दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला परवानगी नसल्याने राजू शेट्टी व त्यांच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांविरोधात बारामती शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन ठाकरे सरकारला त्यांनी खडे बोल … Read more

पुणेकरांनो सावध रहा !! मास्क न घातल्यास होऊ शकतो हजार रुपये दंड

पुणे | भारतात कोरोनाचा कहर काही कमी होताना दिसत नाही.त्देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच चिंतेची बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रतील दोन महत्वाचे शहर  मुंबई आणि पुणे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या आकडेवारी अग्रस्थानी असलेल्या मुंबईला मागे ढकलत पुण्यांना अव्वल स्थान काबिज केले आहे. मधल्या काळात राज्य … Read more

केवळ युवासेनेच्या आग्रहाखातर ठाकरे सरकारने एकतर्फी निर्णय घेतले- देवेंद्र फडणवीस

पुणे । सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असा निकाल दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात केवळ युवासेनेच्या आग्रहाखातर राज्य सरकार सातत्याने एकतर्फी निर्णय घेत होतं अशी टीका त्यांनी केली आहे. पुण्यातील बाणेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रसारमाध्यमांसी बोलत होते. यावेळी बोलताना … Read more

MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

MPSC

मुंबई । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. करोना संकट टळलं नसल्याने एकीकडे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना … Read more

बाबा आमटेंवरही कुष्ठरोग्यांकडून काम करून घेणारा आनंदवनचा हिटलर अशी टीका झाली होती…

Baba Amte

बाबा आमटे यांनी एकदा कि तुमच्या मनाचा ताबा घेतला कि तुम्ही पाहिल्यासारखे होऊच शकत नाही. असे पु.ल. देशपांडे म्हणायचे. कुसुमाग्रज तर बाबा आमटेंच वर्णन ‘अफाट नैतिक शक्तीच धगधगणार बलाढ्य इंजिन’ असं करतात. असं कोणतं वलय या माणसाला लाभलं होत ते समजून घेतल्यावर पुलंच्या वाक्याच्या प्रचिती येते. दगडांच्या भग्नावशेषांमधे सौंदर्य शोधणार्‍या या मानवजातीतील या मानवाने मात्र … Read more

खोटे शपथपत्र दाखल केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील गोत्यात येण्याची शक्यता; कोर्टाने दिले तपासाचे आदेश

पुणे । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना येत्या काही दिवसात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. न्यायालयानं पाटील यांच्या नावे फेक ऑफिडेव्हीट प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. कोथरुडच्या डॉ, अभिषेक हरिदास यांनी पाटील यांच्याविरोधात शपथपत्रात माहिती लपवल्याचा दावा केला होता. पाटील यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात आपण दोन कंपन्यांचे संचालक असल्याचे उत्पन्न लपवले. याशिवाय एका केसमध्ये … Read more

पुण्यात कोरोनामुळं निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल- राजेश टोपे

पुणे । राज्यातील कोरोना संसर्गाचं केंद्रबिंदू बनलेल्या पुणे शहरात अजूनही कोरोनाचा कहर कायम आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यात निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, अशी शाश्वतीराज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सध्याच्या घडीला पुण्यात कोरोना रुग्णांसाठी बेडची अडचण नाही. परंतु, आम्ही ऑक्सिजन आणि आयसीयू बेडस वाढवण्यावर भर देत … Read more

अंनिसतर्फे आयोजित पहिल्या ई-नाट्य स्पर्धेत डी. जी. रुपारेल कॉलेज अव्वल

पनवेल प्रतिनिधी | नाजूका सावंत शहीद डाॅक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाच्या निषेधार्थ ‘हिंसा के खिलाफ मानवता की और’ या अभियानाअंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पनवेल शाखेतर्फे सलग दुसऱ्या वर्षी विवेक जागर करंडक नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कोरोना संकटाच्या काळात या स्पर्धेचं आयोजन पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं होतं. राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसाद या … Read more