खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचे 18 जानेवारीला लोकार्पण

पुणे, दि.१५ |  खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे. केंद्रीय क्रीडा कार्यक्रम आणि युवा मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आदिती तटकरे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

https://t.co/8qRGA9BFlQ?amp=1

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामधील या राज्य निपुणता केंद्राराज्य निपुणता केंद्रामध्ये ॲथलेटिक्स, शूटिंग व सायकलिंग या तीनही ऑलिंपिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. प्रति खेळ 30 खेळाडूंना या केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या केंद्रासाठी स्पोर्ट्स सायन्स सेंटर देखील मंजूर करण्यात आल्याचे क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

https://t.co/e9ZAExNHpw?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like