पुणे विभागात आज एकूण १ हजार २६२ रुग्णांची वाढ 

पुणे प्रतिनिधी । आज पुणे विभागात एकूण १ हजार २६२ रुग्णांची वाढ झाली आहे. विभागातील एकूण रुग्णसंख्या आता ३६ हजार ६७१ इतकी झाली आहे. आतापर्यंत विभागातील २२ हजार ४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या १३ हजार ३४२ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. आतापर्यंत विभागातील एकूण १ हजार २८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करताहेत, तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय- शरद पवार

पुणे । महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता, नाराजी वगैरे काहीही नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करताहेत. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे’, असे नमूद करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले. शरद पवार यांची आज पुण्यात व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी … Read more

मोतोश्रीवर जाण्यात मला कमीपणा वाटत नाही; पवारांनी चंद्रकांतदादांच्या ‘त्या’ सल्ल्याला दिला खो

पुणे । महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू असताना आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यात महत्त्वाची पत्रकार परिषद झाली. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणं बरोबर नाही. या वयात खरंतर मुख्यमंत्र्यांनी पवारांना भेटायला जायला हवं असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यावर शरद पवार यांनी मोतोश्रीवर … Read more

पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक कोरोना पॉझिटिव्ह

पुणे । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सामान्य नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधी सुद्धा कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. पुण्यातील भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वत: मुक्ता टिळक यांनी टि्वट करुन त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. आमच्या दोघींमध्ये कोरोनाची कुठलीही … Read more

कोरोना काळात फडणवीस दौरे करतायत तर उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडत नाही- चंद्रकांत पाटील

पुणे । कोरोना संकटात राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दररोज राज्याच्या वेगवेगळ्या भागांचे दौरे करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीवरून बाहेर पडायला तयार नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. … Read more

कोरोनाची सुरक्षित आणि प्रभावी लस यायला अजून किमान ६ महिने लागतील- अदर पुनावाला

पुणे । कोरोना व्हायरसवरमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. त्यामुळं कोरोनावरील लस शोधण्यात संपूर्ण जगात प्रयत्न सुरु आहेत. पण कोरोनाचा दिवसागणिक प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनावर लस कधी येणार या प्रश्नाचे उत्तर आज कोणाकडेही नाही. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांना याबाबत प्रश्न केला असता कोरोनाची लस यायला अजून किमान सहा महिने लागतील असं त्यांनी सांगितलं. … Read more

धक्कादायक! पुण्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या

पुणे । पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. एका ६० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने क्वारंटाईन सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास येवलेवाडी परिसरात घडली. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. A 60-year old man died by suicide at a quarantine centre of … Read more

पुण्यात दिवसभरात सापडले ८२४ रुग्ण; एकुण रुग्णसंख्या २८,९६६ वर

पुणे । पुण्यात आज ४७ रुग्ण आढळून आले आहेत तर पुणे महापालिका परिसरात एकूण ५२० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात आज २५७ नवीन रुग्ण आढळून आले. पुणे जिल्ह्यात एकूण ८२४ रुग्ण आढळून आले यासोबतच आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २८,९६६ झाली आहे. पुण्यातील रुग्ण २४२२, महापालिका परिसरातील रुग्ण २२७५६ तर पिंपरी चिंचवड … Read more

पुण्यात कोरोनाचा धुमाकुळ! दिवसभरात सापडले ८५२ रुग्ण 

पुणे प्रतिनिधी । पुणे शहारत रविवारी दिवसभरात ८५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता पुणे शहरातील एकूण रुग्ण २१ हजार ५२० इतके झाले आहेत. रविवारी एकूण १२ रुग्ण मृत झाले. आतापर्यंत पुण्यात एकूण ७१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण ४२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरातील १३ हजार १०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणे महापालिकेच्या … Read more

कोरोना होऊ नये म्हणून ‘जलनेती’ हा घरगुती उपाय सर्वोत्तम; डॉक्तरांचा दावा

पुणे । देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता २ लाखांच्या पार गेली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना होऊ नये यासाठी जलनेती हा सर्वोत्तम उपाय असल्याचा दावा पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ धनंजय केळकर यांनी केला आहे. जलनेती हा मुख्यपणे … Read more