बंद यशस्वी झालाय असं म्हणत प्रकाश आंबेडकरांकडून ४ वाजता महाराष्ट्र बंद मागे

मुंबईतील बंदबाबत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी रेल्वे, बेस्ट आणि व्यापाऱ्यांचा दाखला देत बंद यशस्वी झाल्याचं सांगितलं.

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी CYDA चा पुढाकार, रोजगाराच्या नवीन संधींसाठी व्हा तयार..!!

पुण्यातील सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज (CYDA) या संस्थेतर्फे महिलांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. ८ दिवस ते ३ महिने एवढ्या कालावधीत चालणारी ८ प्रशिक्षण सत्रे CYDA तर्फे आयोजित करण्यात आली आहेत. केवळ महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये इलेक्ट्रिशियन, मोटारसायकल दुरुस्ती, पेंटर, डिलिव्हरी असिस्टंट, पेट्रोलपंप असिस्टंट, मोबाईल रिपेअरिंग, ड्रायव्हिंग आणि एलईडी दिवे बनवणे यांचा समावेश आहे.

पर्यावरणाच्या संपूर्ण अभ्यासासाठी दर्जेदार पुस्तक – पर्यावरण व परिस्थितिकी

पुस्तकांच्या दुनियेत | स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची एक खासियत असते. प्रत्येकजण आपली अभ्यासाची एक वेगळी शैली जोपासून असतो. पुस्तकं कोणतीही वाचली तरी नोट्स काढणं हे प्राधान्याने ठरलेलंच असतं. पण एखादं असं पुस्तक बाजारात आलं असेल की ज्यामध्ये विषयाच्या नोट्सच तुम्हाला काढून दिलेल्या असतील..? ते ही झकास रंगसंगती आणि चित्रांच्या माध्यमातून..!! ऐकायला थोडं वेगळं वाटलं … Read more

पुण्यात आधी ‘आफ्टरनून लाइफ’ सुरू करायला हवं – आदित्य ठाकरे

पुण्याचे लोक दुपारी झोपतात. या प्रचलित समजावर आदित्य ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

रंग यावा म्हणून येवले चहात केली जाते भेसळ, आणखी कोणत्या त्रुटींमुळे एफडीएने येवलेंना फटकारले?

काही महिन्यांपूर्वी पुणेस्थित ‘येवले चहा’ या प्रसिद्ध चहा व्यावसायिकांवर मेलामाईट पदार्थाची भेसळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. अन्न आणि औषध प्रशासनाने यासंदर्भात कार्यवाही केली असता त्यांना या प्रकारचा कोणताच खात्रीशीर पुरावा मिळाला नाही. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणं आमच्या नैतिकतेत बसत नाही, असा खुलासाही त्यावेळी नवनाथ येवले यांनी आपल्या दुकानातर्फे दिला होता.

धक्कादायक! वेश्या व्यवसायातून पुणे विद्यापीठातील दोन विद्यार्थिनींची सुटका

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दोन विद्यार्थिनींची वेश्या व्यवसाय करणाऱ्या दलालांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. दोन्ही विद्यार्थिनी परदेशी नागरिक असून तुर्कमेनिस्तानच्या रहिवासी असल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश रेवले यांनी सेक्स रॅकेटवर कारवाई करत दोघींची मुक्तता केली.

साखर कारखानदारीमुळेच राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला – शरद पवार

पुणे : साखर कारखानदारीमुळेच राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला. शिक्षण,आरोग्य व मूलभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती घडून आली. त्यामुळे सध्या अडचणीत आलेला साखर उद्योग जगावा, वृद्धिंगत व्हावा व त्यायोगे ग्रामीण भागातील माझा शेतकरी सुखी-संपन्न व्हावा, यासाठी मी तत्परतेने प्रयत्न करेन, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवारांनी व्यक्त केले. लोकसत्ता परिवाराने पुण्यात आयोजित केलेल्या साखर … Read more

इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाला माझा विरोध, तो निधी वाडिया हॉस्पिटलला द्या – प्रकाश आंबेडकर

पुणे : इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाला माझा विरोध आहे, त्या स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलला देण्यात यावा अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाकडे केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जो निधी आंबेडकर पुतळ्यासाठी किंवा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी दिला असेल तो निधी वाडिया हॉस्पिटलसाठी वर्ग करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने काढावा, अशी माझी विनंती आहे. … Read more

भाजपमध्ये केलेली मेगाभरती ही चूकच होती- चंद्रकांत पाटील

 पुणे प्रतिनिधी ।  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं अन्य पक्षांतील आमदार व खासदार यांना फोडत आपल्या पक्षात सामील करत तिकीट वाटपाचा धडाकाच लावला होता. भाजपच्या मेगाभरतीवर जेव्हा टीका होत होती त्यावेळी आमच्याकडं वॉशिंग मशीन आहे, असं म्हणण्यापर्यंत भाजपच्या नेत्यांची मजल गेली होती. मात्र, निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानं आणि सत्ता हातची गेल्यानंतर आता भाजपचे नेते चिंतन … Read more

‘माझं घड्याळाचं दुकान नाही मात्र घड्याळवाले माझे पार्टनर आहेत’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारामती दौऱ्यावर आहेत. गुरूवारी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विकास केंद्र बारामती यांच्यातर्फे माळेगाव येथे भरविण्यात आलेल्या ‘कृषिक २०२०’ या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. या उदघाटनावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कृषिमंत्री दादा भुसे, प्रसिद्ध अभिनेते आमीर खान पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायमंत्री सुनील केदार आणि बारामती कृषी विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार या वेळी उपस्थित होते.