उमेदवार बसपाचा, काम केलं राष्ट्रवादीचं; शिक्षा म्हणून बारामतीमध्ये काढली धिंड

अशोक माने यांनी राष्ट्रवादीकडून पैसे घेऊन त्यांचं काम केल्याचं निवडणुकीपूर्वीच बोललं जात होतं. त्यानंतर त्यांच्यावर पक्षाने कारवाईही केली होती.

अहो पाटील कोथरूडवर बोलू काही! ‘आप’ उमेदवार अभिजित मोरे यांचे चर्चेचे आवाहन

पुण्यातील कोथरूड मतदार संघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार अभिजित मोरे यांनी भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांना कोथरूडच्या मुद्द्यांवर बोलण्याचे आवाहन केले आहे. कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर चर्चेसाठी येण्याचे आवाहन त्यांनी सोशल मीडिया व पत्रकारांच्या द्वारे केलं होतं.

पुण्यातील हॉटेल ड्रीमलँडला भीषण आग; बघ्यांची एकच गर्दी

पुणे स्टेशन परिसरातील ड्रीमलँड हॉटेल आगीच्या विळख्यात सापडलं आहे. हॉटेलच्या तिन्ही मजल्यांवर आग पसरली आहे.

अहो खरंच, प्रेमभंगामुळे मिळत नाही गणिताचं नोबेल..!!

आजच्या काळात म्हणायचं झाल्यास ‘तू मला मित्र म्हणूनच चांगला वाटतोस’ टाईप तिचं बोलणं झालं असेल. या घटनेनंतर आल्फ्रेडनेसुद्धा पुन्हा लग्न करण्याचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाकला. आयुष्यभर तो एकटाच राहिला. लग्न न करता.

“तुझी इच्छा असेल तर माझी तुझ्याशी लग्न करायची तयारी आहे.. !!” महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या आंतरजातीय लग्नाची रंजक गोष्ट

“मी तिच्याजवळ लग्नाचा विषय काढला त्यावेळी ती हलकेच हसली. तिला त्या वेळी मी लॅक्मे पावडरची डबी भेट दिली होती. त्यावेळी तिला मी दिलेली ही पहिली भेटवस्तू. तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचा स्वभाव मला आवडायचा. ती कमी बोलायची. हातचं राखून बोलायची. पण तिला चांगल्या फुलांची, चांगल्या गाण्यांची आवड होती. तिच्या आणि माझी आवडीनिवडी सारख्याच होत्या. तिच्या भावाला मात्र आमचं असं एकत्र असणं पटत नव्हतं.”

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी गडकिल्ले भाड्याने दिले तर कुठे बिघडलं – उदयनराजे भोसले

राजकीय कोलांटउड्या मारण्यात माहीर असलेले उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी पैसे लागतातच. आवश्यक तेवढा निधी सरकारकडे उपलब्ध नसेल, किंवा असलेला निधी दुसऱ्या कामांसाठी वापरला जात असेल तर लग्न-समारंभासाठी गडकिल्ले भाड्याने देण्यात काहीच चुकीचं नाही असं विधान उदयनराजे यांनी केलं आहे.

ते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे

परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.

पंकजा मुंडेंच्या सभेतील गोंधळाचं भाजप कनेक्शन?

पिंपरी चिंचवड प्रतिनिधि | भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे रविवारी पुणे दौर्‍यावर होत्या. यावेळी पिंपरी चिंचवड येथील प्रचार सभेत गोंधळ झाला. पंकजा मुंडेंचे भाषण सुरु असताना नागरीकांमधून काही जणांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवड परिसरात मराठवाड्यातून मोठा वर्ग आला अाहे. त्यांनी भाजपलाच मतं द्यावीत यासाठी जगताप यांनी … Read more

जेव्हा अजित पवार आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते समोरासमोर येतात

बारामती प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठीचे वातावरण चागलेच तापले आहे. सर्वत्र उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचारासाठी धावाधाव सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बारामतीतही राष्ट्रवादी आणि भाजपकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. बारामतीत अजित पवार यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या कुटुंबियांबरोबरच त्यांचे धाकटे पुत्र जय पवार हे सांभाळत आहेत. वेगवेगळ्या भागात जाऊन जय पवार मतदारांच्या गाठीभेटी घेत … Read more

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची फडणवीस सरकारविरुद्ध नाराजी; भ्रष्टाचारी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी

चालू सरकारच्या काळात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा कमी होणे, परीक्षांचे निकाल वेळेवर न लागणे, परीक्षा उत्तीर्ण होऊनसुद्धा पोस्टिंग न मिळणे, परीक्षा घेणाऱ्या वेबसाईटमध्ये त्रुटी असणे या मूलभूत अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागत आहे. विद्यार्थ्यांनी वारंवार आंदोलन करूनही त्यांना याप्रश्नी न्याय मिळाला नाही.