वृत्तसंस्था । देशातील प्रवास वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु केली जात आहे. त्यानुसार रेल्वेच्या घोषणा करण्यात आल्या होत्या आणि सोमवारपासून हवाई वाहतूकही सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी असे जाहीर केले होते. मात्र महाराष्ट्राच्या संचारबंदी नियमांमध्ये १९ मे नंतर काहीच सुधारणा झाल्या नसून ३१ मे पर्यंत विमान वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव भूषण गगराणी यांनी आज दिली आहे.
बुधवारी हरदीपसिंग पुरी यांनी देशांतर्गत हवाई प्रवासाची घोषणा करून किमान व कमाल दरांची यादीही जाहीर केली होती. यानुसार देशात अंतर्गत विमान प्रवास सोमवारपासून सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र महाराष्ट्रातील रुग्णांची वाढती संख्या पाहता रेल्वेप्रमाणेच विमान वाहतुकीलाही ३१ मे पर्यंत प्रतिबंधित करण्यात आले आहे. ३१ मे नंतर पुढील आदेश जारी केले जातील. अद्याप नागरिकांना विमान प्रवास करता येणार नसल्याची माहिती गगराणी यांनी दिली आहे.
State government has not amended its lockdown order dated 19.5.2020. No air travel allowed yet in this order: Maharashtra Government pic.twitter.com/tf9qzvWNXE
— ANI (@ANI) May 23, 2020
दरम्यान महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ४७ हजार १९० इतकी झाली असून सर्वाधिक रुग्ण मुंबई येथे सापडले आहेत. आजअखेर मुंबईमध्ये २८,८१७ रुग्णांची असून राज्यात १,५७७ रुग्ण मृत्यू पावले आहेत. राज्याची स्थिती इतर राज्यांच्या तुलनेने अधिक बिकट असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्यातरी ३१ मी पर्यंत विमान प्रवास करता येणार नाही आहे.