मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाचा कहर कायम असून राजधानी मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या आणखी १५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर त्याचवेळ राज्यात ६५५५ इतके कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील रुग्णसंख्येनं दोन लाखांचा टप्पा पार केला आहे.
District wise #Corona active cases in Maharashtra. As on 5th July 2020.#MaharashtraFightsCorona#WarAgainstVirus pic.twitter.com/nEqzuTbB6q
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) July 5, 2020
राज्यात आज ३६५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १,११,७४० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.०८ % इतके झाले आहे. आज राज्यात ६५५५ नवीन रुग्णांचे निदान झाले. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२७ % एवढा आहे. सध्या राज्यात ८६ हजार ०४० रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११,१२,४४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,०६,६१९ (१८.५७ टक्के ) नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,०४,४६३ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४६,०६२ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज 6555 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 206619 अशी झाली आहे. आज नवीन 3658 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 111740 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 86040 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 5, 2020
राज्यात कोरोना मृत्यूंचा आकडा वाढत चालला आहे. आज १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृत्यूंची संख्या ८ हजार ८२२ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांपैकी मुंबई मनपा-६9, ठाणे मनपा-3, कल्याण-डोंबिवली मनपा-८, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा- भाईंदर- १, वसई-विरार मनपा-४, जळगाव-६, जळगाव मनपा-४, पुणे-३, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-८, सोलापूर मनपा-४, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-१० या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.