मुंबई । राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर होते आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. आज राज्यात मागच्या २४ तासांमध्ये २४ तासांमध्ये ८ हजार १३९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यातील २२३ रुग्णांचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या १० हजार ११६ इतकी झाली आहे.
मागील २४ तासांमध्ये ४ हजार ३६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार ६०० इतकी झाली आहे. यापैकी १ लाख ३६ हजार ९८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ९९ हजार २०२ रुग्ण उपचार घेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे
दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा काही दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते आहे.