मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांचा कोरोनाने मृत्यू 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । जगभरात सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे सध्या सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. देशात आणि राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या ही मुंबईत आढळून आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत मुंबई पालिकेतील एक धडाडीचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांना प्राणास मुकावे लागले आहे. त्यांचे कोरोना संक्रमणामुळे निधन झाले आहे. मुंबई पालिका एच पूर्व विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. आज रुग्णालयातच त्यांचे प्राण गेले. एच पूर्व विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे. त्यांच्या निधानाने पालिकेला फार मोठा धक्का बसला आहे.

या पालिका विभागात वांद्रे पूर्वमधील बहुतांश भाग येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थानही याच विभागात आहे. या भागात कोरोना संसर्गावर सर्वात वेगाने नियंत्रण मिळवण्यात आले. कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणारा हा मुंबईतील पहिला विभाग ठरला आहे. या लढ्यात सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचे योगदान मोठे राहिले आहे. त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याला यश मिळाले मात्र या लढ्यात खैरनार स्वत: कोरोनाग्रस्त झाले त्यांना प्राणासही मुकावे लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, मुंबई महापालिकेतील अनेक कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. एका आकडेवारीनुसार आतापर्यंत सुमारे १०० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर करोनाचे सर्वात मोठे संकट कोसळले आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या मुंबईत करोना नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र झटून काम करत आहेत. त्यातूनच धारावी सारख्या आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. त्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं खास कौतुक केलं आहे. या मोहिमेत वांद्रे पूर्व भाग सर्वात आघाडीवर राहिला. करोना बाधित रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण याच भागात राहिले. या विभागाचे वॉर्ड अधिकारी आणि सहायक आयुक्त अशोक खैरनार या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व करत होते.

Leave a Comment