आजपासून ‘या’ शाळांना सुट्ट्या जाहीर; वाढत्या तापमानामुळे सरकारचा निर्णय

maharashtra school holiday
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शाळकरी मुलांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून म्हणजेच 21 एप्रिल 2023 पासून शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासुन उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून याच पार्श्वभूमीमुळे यंदा मे महिन्यातील सुट्ट्या आता एप्रिल मध्येच देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ज्या शाळांचे अभ्यासक्रम पूर्ण झालेत अशा शाळांना आजपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना दीपक केसरकर म्हणाले, महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता गृहीत धरून 21 एप्रिल पासून मुलांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. ज्या शाळांचा अभ्यासक्रम अद्याप सुरू आहे, त्या वगळता बोर्डाच्या सर्व शाळांना सुट्टी असेल. तसेच शाळा कधी सुरु होतील याचीही माहिती त्यांनी दिली आहे. विदर्भातील शाळा 30 जूनला सुरू होतील तर उर्वरित महाराष्टातील शाळा या 15 जूनपासून सुरु होतील असं केसरकर म्हणाले.

राज्यातील वाढत्या तापमानामुळे पालकांना चिंता लागली होती. त्यामुळे सीबीएसई आणि इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरवण्याची शाळा प्रशासन आणि शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी करण्यात येत होती, यानंतर राज्य सरकारने मोठी घोषणा करत अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांना आजपासून सुट्टी जाहीर केली आहे. तसेच सुट्टीच्या काळात शाळांमार्फत राबवण्यात येणारे अतिरिक्त वर्ग सकाळच्या किंवा संध्याकाळच्या सत्रात राबवण्यात यावे. दुपारच्या सत्रात ते घेऊ नये. आणि नववी आणि दहावीचे विद्यार्थी सोडून इतर कोणत्याही वर्गाच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलवू नये अशा सूचनाही केसरकर यांनी दिल्या आहेत.