महाराष्ट्र अनलॉक : पहा काय आहेत ई – पास संदर्भातील नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यामध्ये कोरोना संदर्भात आता दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. दररोज बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर करुणा मुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेनुसार राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जाहीर केली असून ती सोमवारी सात जून पासून लागू होणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती समोर आली आहे. रुग्ण संख्या आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यानुसार राज्यातील जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार आहे. अनलॉकची प्रक्रिया ही पाच लेव्हल मधले केली जाणार आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याकरिता ई – पासची आवश्यकता होती. मात्र आता या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

अनलॉक च्या पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच जिल्हे, तिसऱ्या टप्प्यामध्ये दहा जिल्हे आणि चौथा टप्प्यांमध्ये दोन जिल्हे असणार आहेत.

अनलॉक लेव्हल आणि जिल्हे

*पहिली लेव्हल — औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ. या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

*दुसरी लेव्हल— अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर आणि नंदुरबार. पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के ऑक्सिजन बेड 25 ते 40 टक्के दरम्यान व्यापलेले असावेत.

*तिसरी लेव्हल — अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद आणि कोल्हापूर. पॉझिटिव्हिटी रेट पाच ते दहा टक्के असावा ऑक्सीजन बेड हे 40 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील.

*चौथी लेव्हल — पुणे आणि रायगड. पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20% असेल तसंच इथं ऑक्सीजन बेड 60 टक्‍क्‍यांच्या वर व्यापलेले असतील. अशा जिल्ह्यांचा या चौथा लेबल मध्ये समावेश आहे.

*पाचवी लेव्हल — या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड ते 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेली असतील.

आंतरजिल्हा प्रवासासाठी नियमावली

लेवल 1 मध्ये येणाऱ्या जिल्ह्यामध्ये वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली असून ई पासची फारशी गरज पडणार नाही. मात्र पहिल्या लेव्हल मध्ये येणाऱ्या जिल्हा मधून प्रवास करताना पाचव्या लेव्हल म्हणजेच संसर्गाचा धोका अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रवास करायचा असल्यास ई पास ची गरज लागणार आहे. दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या गटांमध्ये येणाऱ्या जिल्ह्यातही हाच नियम लागू आहे. संसर्गाचा धोका अधिक असलेला जिल्ह्यांमधून प्रवास करायचा असल्यास ही पासची आवश्यकता असणार आहे. पाचव्या गटातील जिल्हे वगळता इतर गटातील जिल्ह्यांमध्ये प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे.
पाचव्या गटातील जिल्ह्यांमध्येही पासची सक्ती कायम राहणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी चादर हा 20 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक किंवा 75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटामध्ये मोडतात. या जिल्ह्यांमधून बाहेर जाताना किंवा या जिल्ह्यांमध्ये येताना आवश्यक असणाऱ्या या जिल्ह्यांमधून प्रवास करण्यासाठी ई पास लागणार आहे. जिल्ह्यातील व्यक्तींना बाहेर जाण्यासाठी काही विशेष कारणासाठीच सवलत दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय कारणासाठी किंवा अत्यावश्यक सेवेच्या कामासाठी प्रवास करण्यासाठी ई – पास दिला जाईल.

Leave a Comment