देवेंद्र फडणवीस मोठी जोखीम पत्करण्याचे करत आहेत चिंतन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपला विजयाच्या मार्गावर गतिमान करून पक्ष नेतृत्वाचा विश्वास जिंकला. त्यांनी जिंकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी आणि कायमी ठेवण्यासाठी मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागल्या पासून खूप कसोशीने प्रयत्न केले आहेत. आता मात्र त्यांना मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार हे मात्र निश्चित आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री वाटेतील एक एक अडथळा आत्ता पासूनच दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांना एक जोखीम देखील पत्करावी लागणार आहे.

एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेहमीच अडविण्याचा आणि आडकाठी करण्याचा प्रयत्न केला आहे. काना मागून आली आणि तिखट झाली हि म्हणं खडसेंना नपचल्याने त्यांनी फडणवीसांना सतत विरोध केला. याचा फटका त्यांना चांगलाच भोगावा लागला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खडसेंचा पत्ता कट करण्याच्या तयारीत आहेत असे देखील बोलले जाते आहे. मात्र खडसे मुख्यमंत्र्यांना सव्वा शेर आहेत. आपल्या मागे जनात आहे पक्ष पाठीमागे उभा नाही राहिला तरी हरकत नाही असे सूचक विधान करून त्यांनी तिकीट कापल्यास बंडाचा झेंडा उभारण्याची पूर्ण तयारी केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री, खडसेंना घरचा रस्ता दाखवणार या चर्चांनी राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेला उधाण आले आहे. मात्र खडसेंना महाराष्ट्राच्या राजकारणातून सहजा सहजी बाहेर करणे सोपे नाही. कारण त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात भाजपच्या संघटनेनेत आपली माणसे पेरली आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या गटाचे सुद्धा ते लाडके आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्ष संघटनेची भाजप नाराजी स्वीकारणार नाही असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

Leave a Comment