वर्धा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे आता वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून जिल्ह्याच्या सर्व बँकांमध्ये ग्राहक सेवेच्या व्यवहाराची वेळ दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात येईल असा आदेश काढला आहे.
राज्यात संचारबंदी असली तरी लोक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. यामुळे जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेच्या दुकानांच्या वेळेत बदल करून ती २ वाजेपर्यंतच उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच लोक बँकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या सर्व बँकांच्या वेळेत बदल करत ती २ वाजेपर्यंत केली आहे.
बँकांचं कार्यालयीन कामकाज हे नियमित वेळेत सुरू राहणार आहे फक्त बँकांच्या व्यवहाराची वेळ बदलण्यात आली आहे. हा आदेश १ मेपासून लागू करण्यात येणार आहे. या सूचना जिल्ह्यातील सगळ्या बँकांना देण्यात आल्या आहेत. शनिवारी वर्धा जिल्ह्यात ६१३ नव्या कोरोना रुग्ण सापडले आहेत तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
वर्धा जिल्ह्याची कोरोना स्थिती खालीलप्रमाणे
आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची संख्या – ४१५१
आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने – २३५४७८
प्राप्त झालेले अहवाल – २३५४५८
निगेटिव्ह अहवाल -२०७३०७
प्रलंबित अहवाल – २०
जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या – २६३६८
शनिवारी कोरोनामुक्त झालेले रुग्ण – ३९५
एकूण कोरोनामुक्त झालेले रुग्ण – २१६४७
एकूण मृत्यू – ५५२