पंजाब, राजस्थाननंतर महाराष्ट्रही लॉकडाऊन होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी पंजाब आणि राजस्थान सरकारांनी संपूर्ण राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. औषधी दुकानं, किराना दुकानं, मीडिया आणि वैद्यकीय उपचार यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही गोष्टी सुरू राहणार नाही आहेत. एखाद्या व्हायरसच्या भीतीने संपूर्ण राज्य बंद करण्यात आल्याचे इतिहासात प्रथमच घडले आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा महाराष्ट्र लॉकडाउन करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

करोनामुळे आज मुंबईत आणखी एकाचा मृत्यू झाला. एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना एका ६३ वर्षीय व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना बळींची संख्या आता २ वर गेली असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. तर राज्यातील करोना रुग्णांची संख्या वाढत असून ती ६४ वरून ७४ वर झाली आहे. नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये आणि संसर्ग टाळावा, असं वारंवार आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मात्र, करोनाबाधितांची वाढत जाणारी संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर पाऊल उचलत राज्य लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment