महत्वाची बातमी : पुण्यात सायंकाळी 6 नंतर संचारबंदी? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरु

Ajit Pawar Pune

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक सध्या सुरु आहे. पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात सायंकाळी 6 नंतर संचारबंदी लागू होऊ शकते अशी माहिती मिळत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात सुरु असलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि … Read more

बा विठ्ठला ! कोरोना मुळे यंदाची माघी वारी देखील रद्द

सोलापूर | “पंढरीची वारी आहे माझे घरी, वारी चुको न दे हरी” असं अभिमानाने सांगणारा महाराष्ट्रातला बहुसंख्य वारकरी, माळकरी वर्ग आहे. पण यंदा मात्र कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आषाढवारी रद्द करण्यात आली होती. नंतर त्यापुढची माघीवारी देखील रद्द करण्यात आलं आहे. म्हणून बा विठ्ठला ! तुझ्या वारीसाठी अजून किती दिवस तिष्ठत ठेवशील आम्हाला अशी भावना … Read more

सोमवार पासून सुरु होणाऱ्या संचारबंदीत पुण्यात काय सुरु राहणार अन् काय बंद? जाणुन घ्या

पुणे । राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही सर्वाधिक आहे. पुण्यातील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. अजित पवार यांनी ही संचारबंदी जाहीर केली होती. १३ जुलै पासून २३ जुलैपर्यंत पुण्यात संचारबंदी असणार आहे. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवांचा सुरु राहणार आहेत. … Read more

पुणे जिल्ह्यात पुन्हा कडक संचारबंदी? अजित पवारांचे आदेश

पुणे प्रतिनिधी | पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगान वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 582 वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक संचारबंदी लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील … Read more

औरंगाबादमधील कोरोनाबाधितांचा आकडा 7900 पार

औरंगाबाद प्रतिनिधी | जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७९०० वर गेला आहे. यापैकी ४२०० रुग्ण बरे झाले असून ३४० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३४०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येमुळे औरंगाबादमध्ये ८ दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यु राबविण्यास आजपासून सुरुवात झाली असून १८ तारखेपर्यंत नागरिकांनी काटेकोरपणे याचं पालन करावं अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. … Read more

मोठी बातमी! औरंगाबाद मध्ये कर्फ्यू जाहीर; १० ते १८ जुलै दरम्यान संचारबंदी जारी

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होते आहे. जिल्ह्यात रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कर्फ्यू जाहीर करण्याचे ठरविले आहे. दिनांक १० जुलै ते १८ जुलै  या कालावधीत जिल्ह्यात कर्फ्यू असणार आहे. आज लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्या बैठकीत … Read more

कोरोनामुक्त झाल्यानंतर MIM च्या नेत्याची जंगी मिरवणूक; २०० जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी | माजी नगराध्यक्षने कोरोनावर मात केल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत जंगी मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी वैजापूर शहरात घडला. या प्रकरणी सुमारे दोनशे जनांवर विविध कलमाखाली वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजापुरचे माजी नगरअध्यक्ष व एमआयएम चे नेते अखिल शेख यांना कोरोनाची लागण झाली होती, शहरात उपचार केल्यानंतर ते कोरोनामुक्त … Read more

यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा कसा असेल? पहा काय म्हणतायत छत्रपती संभाजीराजे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोनामुळे संचारबंदी सुरु आहे. आता संचारबंदीचे नियम शिथिल करण्यात आली असली तरी संचारबंदी पूर्णतः उठविण्यात आलेली नाही. दोन दिवसांनी शिवराज्याभिषेक आहे. २००७ पासून रायगडावर शिराज्याभिषेक हा लोकोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. मात्र यंदा दरवर्षी लाखोंच्या उपस्थितीत साजरा होणारा हा उत्सव यावर्षी कशा पद्धतीने साजरा होणार असा … Read more

लाॅकडाउनमध्ये ‘ही’ अभिनेत्री युट्यूबवरुन देतेय मुंबईतील घडामोडींचे अपडेट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतभरात संचारबंदीमुळे सर्व जण घरामध्ये बसून आहेत. चित्रपट, मालिका यांचे शूटिंग बंद आहे तसेच मालिकांचे जुने भाग पुप्रक्षेपीत केले जात आहेत. काही सेलिब्रिटी मात्र विविध व्हिडीओ बनवून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. सोबत मुंबईतील घडामोडींचे अपडेट्स देते आहे. असे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. आर्या वोरा या अभिनेत्रीने स्वतःचे … Read more

१२ वर्षाच्या वयात केवळ साठवलेल्या पैशातून तिने ३ मजुरांचे विमानाचे तिकीट काढले 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुलांनी आपल्या साठवलेल्या पैशातून गरीब लोकांना मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्या पॉकेटमनीत मिळालेल्या पैशातून एका मुलीने असेच एक कौतुकास्पद काम केले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या या काळात संचारबंदीमुळे मजुरांचे होणारे हाल ती सातत्याने दूरदर्शनवरून पाहत होती. आणि आपण ही आपली जबाबदारी म्हणून काहीतरी केले पाहिजे म्हणून तिने चक्क तिच्या साठवलेल्या … Read more