हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘कोरोनाच्या विघ्नातून राज्याला लवकरात लवकर मुक्ती मिळो,’ असं साकडं गणरायाला घातलं आहे.
तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो अशी प्रार्थना केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला श्री गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. (२/२)
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 21, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करून जनतेला उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षी प्रमाणे यंदाही करत आहोत, मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी. तसंच, या आजाराचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो,’ अशी प्रार्थना त्यांनी गणपती बाप्पा कडे केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’