‘या’ कारणासाठी शरद पवारांनी केला नवा प्लॅन, केली समिती स्थापन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मोदी सरकार सहकारी बँकांच्या संदर्भात नवीन नियमावली आणत सहकारी बँकांवर निर्बंध आणले जाणार आहेत. त्याच्याच संदर्भात कायदा मधील सुधारणांचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी बैठक घेतली होती. त्यावेळी सहकारी बँकांच्या संदर्भात एक समिती स्थापन करावी अशी सूचना पवार यांनी केली होती. त्यानुसार एक उपसमिती स्थापन केली असून भविष्यात केंद्र सरकारच्या विरोधात महाविकासआघाडी सरकारने कायदेशीर मार्गाने संघर्ष करण्याची तयारी केली आहे. सहकारी बँका जगवण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी ही समिती काम करणार आहेत.

कोण असणार या समितीत ?

मिळालेल्या माहितीनुसार या समितीचे अध्यक्ष सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे असणार आहेत. तसेच या समितीमध्ये महाविकासआघाडी पक्षातील तिन्ही नेते असणार आहेत. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम हे देखील यामध्ये असणार आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हे असतील. तर शिवसेनेकडून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख असणार आहेत विशेष म्हणजे या उपसमितीची पहिली बैठक उद्या होणार आहे.या समितीत सहकार क्षेत्रातील तज्ञ असणार आहेत. अरविंद कुमार अप्पर मुख्य सचिव, सहकार विद्याधर अनासकर प्रशासक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, विश्वास ठाकूर चेअरमन विश्वास नागरी सहकारी बँक, अनिल कवडे सहकार आयुक्त हे या समितीत असतील.

Leave a Comment