महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांना सुरक्षेत वाढ करण्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हटलं आहे. सरकार माजी मंत्र्यांना सुरक्षा पुरवतं, मग आजी मंत्र्यांना आवश्यक सुरक्षा हवी, असं या मंत्र्यांचं म्हणणं आहे. यांवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड हे सनातन संस्थेपासून जीवाला धोका असल्याचं गुप्तचर यंत्रणेने स्पष्ट करुनही तत्कालिन भाजपा सरकार राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने फडणवीस सरकारवर केला होता. दरम्यान, गेल्या वर्षी जानेवारी २०१९ मध्ये फडणवीस सरकारने आव्हाडांची सुरक्षाव्यवस्था कपात केली होती. विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करत फडणवीस सरकारने त्यांची सुरक्षा काढली गेली होती. तर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धोका आहे, त्यामुळे आपल्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या दोन्ही विद्यमान मंत्र्यांच्या सुरक्षा मागणीनं राज्यातील कायदा सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.