व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; महावितरणमध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Mahavitaran Recruitment 2023) लिमिटेड, गडचिरोली येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / तारतंत्री/ COPA) पदांच्या एकूण 109 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, गडचिरोली

पद संख्या – 109 पदे

भरली जाणारी पदे – शिकाऊ उमेदवार

विजतंत्री – 54 पदे
तारतंत्री – 42 पदे
कोपा – 13 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – गडचिरोली

वय मर्यादा –

18 ते 32 वर्ष

मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथील

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता 10 वी उत्तीर्ण.
2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण

आवश्यक कागदपत्रे –

एस.एस.सी. व आय. टी. आय. विजतंत्री / तारतंत्री चार सत्र (4 सेमीस्टर ) / व कोपा या व्यवसायातील दोन सत्रांची (2 सेमीस्टर) उत्तीर्ण गुणपत्रिकेची मुळ प्रत.
आधारकार्ड
मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र व रहीवासी प्रमाणपत्र (Mahavitaran Recruitment 2023)
इतर सर्व अनुषंगीक आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करुन अपलोड करावे व सुसंगत असलेली माहिती भरावी.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/