Saturday, March 25, 2023

अयोध्यात भव्य राम मंदिरासाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ स्थापना करणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग यापूर्वीच मोकळा झाला आहे. त्यानुसार राम मंदिर निर्मितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवेदन करताना महत्त्वाची घोषणा केली आहे. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती लवकरच सुरू होणार असून त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मोदींनी दिली.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्वायत्तपणे काम करणार असून राम मंदिराच्या निर्माणासाठी या ट्रस्टकडे ६७ एकर जमीन हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्यास उत्तर प्रदेश सरकारने सहमती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली.

- Advertisement -

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा