सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
राज्याच्या जनतेवर संकट आल्यावर तो राजा राजवाड्यात बसत असेल तर त्या राजाला राज्य करण्याचा अधिकार नाही. कोरोनाचे संकट असताना तो राजा जनतेला सहकार्य करू शकला नाही. स्वतःच्या तोंडावर माशी बसली तर ती खाजवता येत नव्हती. विकलांग राजा असेल तर तो राज्य चालवू शकत नाही, अशी जहरी टीका कोरेगाव मतदार संघाचे शिवसेनेचे बंडखोर आ. महेश शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
सातारा येथे माध्यमांशी संवाद साधताना आ. महेश शिंदे यांनी उध्दव ठाकरे आणि खा. संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. आ. शिंदे म्हणाले, धुतराष्ट्र पुत्रप्रेमामुळे आंधळा झाला होता. मात्र आमचे माजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंधळे होणार नाहीत, ते एकनाथ शिंदे यांना निश्चित पाठिंबा देतील असा विश्वास आहे.
उध्दव ठाकरे विकलांग राजा, राज्य चालवू शकत नाही : आ. महेश शिंदेंची जहरी टीका @HelloMaharashtr @ShivSena @uddhavthackeray pic.twitter.com/ciN1iB9iui
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) August 2, 2022
संजय राऊत यांना शिवसेना संपवायची आहे – आ. महेश शिंदे
संजय राऊत यांना शिवसेना संपवायची आहे. सामनाच्या संपादक पदावर माझा दावा असताना मला जाणीवपूर्वक संपादक केलं नाही, त्यामुळे मी ह्यांना सोडणार नाही असे संजय राऊत खाजगी मध्ये आमच्या आमदारांजवळ बोलत होते. त्याचा प्रत्यय हा मागील 2 महिन्याच्या घडामोडीमधून समोर आला. संजय राऊत यांनी भ्रष्टाचार केला असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. चोर म्हणून जनतेच्या नजरेत येताना संजय राऊत यांनी पक्षाचा गमचा घालायला नको होता. पत्राचाळीच्या भ्रष्ट्राचारात जे काही पैसे मिळाले ते मी एकट्याने खाल्ले नाही सांगण्यासाठी त्यांनी गमचा दाखवून इशारा केला आहे, असा खोचक टोला संजय राऊत आणि शिवसेनेवर आ. महेश शिंदेंनी केला आहे.