Mahindra Motors : ही गाडी तुम्हाला झोपूनच देत नाही; ड्रायव्हरला डुलकी लागली की वाजतो Alarm

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mahindra Motors : जगभरात गाडी चालवताना झोप आल्यामुळे होणाऱ्या अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. लांबचा प्रवास करत असताना अचानक डुलकी लागल्यामुळे मोठं-मोठे अपघात झाल्याचे आपण अनेकदा पहिले आहे. मात्र लांबच्या प्रवासात मध्ये मध्ये थोडा ब्रेक घेणे महत्वाचे आहे. जर ते जमत नसेल आणि झोप येत नसेल तर तात्काळ गाडी चालवणे थांबवायला हवे. मात्र तरीही काही लोकं असे करत नाहीत आणि आपण झोप कंट्रोल करू या विचाराने ते गाडी चालवत राहतात. पुढे जाऊन हाच निष्काळजीपणा मोठ्या अपघाताच्या रूपाने अंगलट येतो.

Drowsy driving may be the cause of 1 out of every 10 auto crashes

याच कारणामुळे आता कार कंपन्यांकडून कारमध्ये एक असे फीचर देण्यास सुरुवात झाली आहे, ज्यामुळे कार चालवताना आपल्याला झोपही येणार नाही. तसेच जर ड्रायव्हर झोपी गेला तर त्याची माहिती लगेचच गाडीत बसलेल्या इतर लोकांनाही मिळेल. भारतीय कार उत्पादकांपैकी एक असलेल्या Mahindra Motors कडून पहिल्यांदा आपल्या दोन SUV मध्ये हे फिचर लाँच केले आहे. चला तर मग हे फीचर नक्की काय आहे आणि कोणकोणत्या कारमध्ये देण्यात आले आहे जाणून घेऊयात…

Driver Drowsiness Detection with OpenCV - YouTube

या फीचर्सबाबत जाणून घ्या

Mahindra Motors कडून आता Advanced Driver Assistance System (ADAS) सोबत ड्रायव्हर ड्रिझिनेस डिटेक्शन (DDD) फीचर्स देण्यात आले आहे. याद्वारे आता ड्रायव्हरला झोप किंवा तंद्री आली तर त्याबाबतीत सतर्क केले जाईल. यामध्ये कारच्या स्टीयरिंग व्हीलवर एक व्हायब्रेशन अलर्ट उपलब्ध असेल. तसेच या दरम्यान कारमध्ये सतत अलार्म वाजेल, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली जाऊ शकेल.

Driver Drowsiness Detection Alert System with Open-CV & Keras Using IP-webCam For Camera Connection

हे फीचर्स स्टीअरिंगवरील ड्रायव्हरच्या हालचाली डिटेक्ट करेल. तसेच जेव्हा स्टिअरिंगवर काही वेळ कोणत्याही प्रकारची हालचाल होणार नाही, तेव्हा ते ऍक्टिव्हेट होईल आणि कारच्या स्टीअरिंग व्हीलवर व्हायब्रेशन करेल. तसेच काही कारमध्ये हे फिचर आणखी एडव्हान्स पद्धतीने देण्यात आले आहे. यामध्ये जर ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत असेल तर याफीचर्समुळे कार सुरू होणार नाही.

Mahindra Scorpio N Price - Scorpio N Images, Review & Colours

कोण-कोणत्या वाहनांमध्ये उपलब्ध आहे ‘हे’ फिचर

Mahindra Motors कडून आपल्या नवीन SUVs XUV 700 आणि Scorpio N मध्ये हे फिचर देण्यात आले आहे. या दोन्ही एसयूव्हीच्या टॉप मॉडेल्समध्ये हे फीचर लाँच केले गेले आहे. तसेच आता येत्या काळात अनेक कंपन्या देखील आपल्या कारमध्ये हे फीचर देणार आहेत. हे लक्षात घ्या कि, काही प्रिमियम कारमध्ये तर हे फिचर आधीपासूनच अस्तित्वात होते. मात्र या गाड्या बहुतांश विदेशी कंपन्यांच्या आहेत. आता भारतीय कार उत्पादकांमध्ये महिंद्राकडून ते पहिल्यांदा लाँच केले गेले आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://auto.mahindra.com/suv/scorpio-n

हे पण वाचा :
LIC ची जबरदस्त पॉलिसी! 4 वर्षांसाठी पैसे जमा करून मिळवा 1 कोटीचा फायदा
New Business Idea : घरबसल्या ‘हा’ छोटासा व्यवसाय मिळवून देईल मोठी कमाई
Recharge Plans : IPL सामने पाहण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वात बेस्ट रिचार्ज प्लॅन
Earn Money : आता घरबसल्या कंपन्यांसाठी ‘हे’ काम करून दरमहा मिळवा लाखो रुपये
Small Saving Scheme : आता ‘या’ लहान बचत योजनांमध्ये पॅन-आधार शिवाय करता येणार नाही गुंतवणूक