तुम्हीही कोरोना लस घेतलीये? मोदी सरकार देईल दरमहा 5000

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही धक्कादायक रित्या वाढत आहे. मात्र कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली आहे. जास्तीत जास्त लोकांनी लस घेण्यासाठी पुढे यावे यासाठी सरकार प्रेरित करत आहे. शक्य त्या मार्गाने त्यासाठी जनजागृती केली जात आहे. दरम्यान मोदी सरकारने देशपातळीवर एक स्पर्धा सुरू केली आहे. करोना लस घेणाऱ्याला मोदी सरकार 5000रुपये देणार आहे.

काय आहे स्पर्धा

केंद्रसरकारच्या mygov.in या वेबसाईटवर कोरोना लसीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

या स्पर्धेत ती प्रत्येक व्यक्ती सहभागी होऊ शकते ज्या व्यक्तींना करोना लस घेतली आहे.
यासाठी कोरोना लस घेताना फोटो काढावा लागेल.या फोटोला लसीकरणाचे महत्व सांगणारी एक छानशी टॅगलाईन द्यावी लागेल. ज्यामुळे इतर लोकांना प्रेरणा मिळेल.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी काय कराल

– mygov.in या वेबसाईटवर जा.
-या वेबसाईट वर लॉग ईन करा.
-तुम्हाला mygov. in लॉगिन आयडीसह, ओटीपी मार्फत किंवा तुमच्या सोशल मीडिया अकाउंट मार्फत हे लॉगिन करण्याची सुविधा आहे.
– तिथे आवश्यक ती माहिती भरा.
– तुमची एंट्री पाठवा.
तिथे तुमचा लसीकरण केलेला फोटो आणि टॅगलाईन पाठवा.

सरकार या सर्व फोटो आणि टॅगलाईन मधून उत्तम फोटो आणि टेबलांची निवड करेल अशा दहा विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्यांना दर महिन्याला पाच हजार रुपये दिले जातील या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 31 डिसेंबर 2021 पर्यंतची मुदत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like