Makar Sankranti 2023 : तिळाचे लाडू बनवण्याची पध्दत अन् त्याचे फायदे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्षातील पहिला (Makar Sankranti 2023) सण म्हणजे मकर संक्राती.. यंदा 15 जानेवारीला हा सण साजरा होतोय. मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या या गोचराला मकर संक्रांती म्हंटल जातं. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लोक घरोघरी गोडाधोडाचे पदार्थ बनवतात. खास करून तीळ आणि गुळाच्या पदार्थांचा यामध्ये समावेश असतो. सध्या थंडीचे दिवस असून मकर संक्रातीला जर तुम्ही तिळाचे लाडू बनवले तर याचे वेगळे आरोग्यदायी फायदे तुम्हाला मिळतील. चला जाणून घेऊया तिळाचे लाडू कसे तयार करावे आणि आपल्या आरोग्यासाठी तिळाच्या लाडूचे नेमके कोणकोणते फायदे होतात याबाबत…

Makar Sankranti 2023  Sesame Ladoo

अशा प्रकारे बनवा तिळाचे लाडू- 

सर्वप्रथम एका कढईत तूप (Makar Sankranti 2023) गरम करून त्यामध्ये तीळ सोनेरी होईपर्यंत तळा.
तीळाचा रंग बदलल्यावर ते एका भांड्यात काढून घ्या आणि थंड करा.
आता दुसऱ्या कढईत पाणी गरम करून त्यात गूळ वितळा.
एकदा का गुळ विरघळला की त्यामध्ये तीळ, वेलची पावडर, काजू बदाम टाकून व्यवस्थित एकजीव करा
त्यांनतर आपण तयार केलेले मिश्रण किंचित थंड करा.
लाडू बनवण्यासाठी हाताला थोड्या प्रमाणात तूप लावा आणि मिश्रणाला गोल आकार देऊन लहान लाडू तयार करा.

Makar Sankranti 2023  Sesame Ladoo

तिळाच्या लाडूचे आरोग्यदायी फायदे- (Makar Sankranti 2023)

तीळ आणि गुळात आयरन, व्हिटॅमीन बी६, व्हिटॅमीन-ई, सेलेनिअम अशी पोषक तत्वे असतात.

तीळाचे लाडूचे सेवन केल्यामुळे (Makar Sankranti 2023) शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी उत्तम राहते. तसेच हृदयासंबंधित काही अडचणीही दूर होतात.

गुळामध्ये लोह असते. त्यामुळे गुळ असलेल्य्या लाडवाचे सेवन केल्यास अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.

थंडीच्या दिवसात शरीराला गरम राहण्याची आणि रोगप्रतिकार शक्तीला मजबूत ठेवण्याची तिळाचे लाडू फायदेशीर ठरतो.

तीळाच्या लाडूचे सेवन केल्यामुळे (Makar Sankranti 2023) आपली हाडे मजबूत होतात. यामध्ये असणारे कॅल्शिअमचे प्रमाण स्नायू आणि हाडांना मजबूत ठेवते.