शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । किशोरवयीन मुलींनी होमोग्लोबीन च्या बाबतीत जास्त काळजी घेतली पाहिजे. कारण जर वाढत्या वयानुसार हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी झाले तर शरीराला त्रास होऊन अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यासाठी शरीरात हिमोग्लोबिनची लेवल योग्य राखणं गरजेचं आहे. शरीरात लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन लेवल कमी होते. त्यामुळे थकवा वाढतो. एनिमियाची समस्याही होऊ शकते. त्यामुळे या सर्व समस्यांपासून वाचवण्यासाठी हिमोग्लोबिनची लेवल योग्य राखणं गरजेचं आहे. आहारात थोडा बद्धल केल्याने हिमोग्लोबिन च्या समस्या दूर होऊ शकतात.

व्हिटॅमिन सी –

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमध्ये व्हिटॅमिन सीचं सेवन करणं फायदेशीर आहे. त्यासाठी आहारात संत्रे, लिंबू, किवी, पेरुचा समावेश लाभदायक ठरु शकतो.

फॉलिक ऍसिड –

शरीरात फॉलिक ऍसिडची कमतरता झाल्यास, हिमोग्लोबिनची लेवलही कमी होऊ लागते. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिन लेवल उत्तम राखण्यासाठी फॉलिक ऍसिडचा आहारात समावेश करणं फायदेशीर आहे. डाळ, कोबी, ब्रोकली, बदाम, मटार, केळी आहारात सामिल करु शकता.मेडिक मध्ये सुद्धा फॉलिक ऍसिड च्या गोळ्या मिळतात. त्याचा वापर करू शकता.

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स –

रक्त तयार होण्यासाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता मनुके भरुन काढण्यास मदत करतात. लोहयुक्त काळे मनुके खाल्याने हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते.

डाळिंब –

डाळिंबामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सीसह लोहदेखील चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे डाळिंबामुळेही हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते.

हिरव्या पालेभाज्या –

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमध्ये व्हिटॅमिन सीशिवाय, हिरव्या पालेभाज्यांचाही आहारात समावेश करणं फायदेशीर आहे.

बदाम –

बदाममध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियमही असतं. बदामाच्या सेवनानेही हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करण्यास मदत होऊ शकते. बदाम हे बौद्धीक क्षमतेसाठी जास्त परिणमकारक ठरू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’