हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता UPI Lite द्वारे ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया आणखी सुलभ होईल, मात्र यासाठी इंटरनेटची आवश्यकता भासेल. आतापर्यंत UPI लाईट द्वारे पेमेंट करण्यासाठी इंटरनेट आवश्यक असल्याच्या बातम्या बाहेर येत होत्या. आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक स्पष्टीकरण जारी करत सांगितले कि,सध्या निअर ऑफलाइन मोडद्वारे पेमेंट केले जाऊ शकते. म्हणजेच, सध्या पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असेल.
हे लक्षात घ्या कि, UPI Lite हे ऑन-डिव्हाइस वॉलेट फिचर आहे ज्याद्वारे युझर्सना UPI पिन न वापरता 200 रुपयांपर्यंत पेमेंट करता येते. त्याच वेळी, UPI Lite बॅलन्सची एकूण मर्यादा 2,000 रुपये आहे.
निअर ऑफलाइन मोड म्हणजे काय ???
NPCI कडून याबाबत सांगण्यात आले की, सर्व पेमेंट सिस्टीम रिअल टाइममध्ये डेबिट आणि क्रेडिट प्रक्रिया करण्यासाठी बँकेच्या पायाभूत सुविधांचा वापर करतात. UPI लाईट सह आम्ही डेबिटची प्रक्रिया (बँकांच्या पायाभूत सुविधांचा वापर न करता) जवळजवळ वेळेतच पूर्ण करतो. निअर-ऑफलाइन म्हणजे हेच आहे.
UPI Lite सर्व्हिस हे एका वॉलेटप्रमाणेच काम करते त्यामुळे याद्वारे बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता भासेल. इथे हे लक्षात घ्या कि, ही सर्व्हिस दिवसातून कितीही वेळा वापरता येते. दुसरीकडे, जर ही सर्व्हिस डिसेबल केली तर वॉलेटमध्ये राहिलेले पैसे बँकेच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.
UPI Lite ची सुविधा ‘या’ यूझर्सना मिळणार
सध्या UPI लाईट फीचर फक्त BHIM App च्या यूझर्ससाठीच सुरू झाले आहे. यासोबतच 8 बँकांकडून देखील ही सुविधा दिली जात आहे. ज्यामध्ये एसबीआय, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडियन बँक, कॅनरा बँक आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांसारख्या बँकांचा समावेश आहे.
UPI Lite फिचर विशेषत: ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही किंवा खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे UPI द्वारे ट्रान्सझॅक्शन करू शकत नाहीत अशा नागरिकांसाठी खूपच फायद्याचे ठरेल. UPI लाईट द्वारे युझर्सना वेगवान आणि कमी मूल्याच्या ट्रान्सझॅक्शनची सुविधा मिळेल. UPI Lite मुळे कोअर बँकिंग सिस्टीमवरील डेबिटचा भार कमी होईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bhimupi.org.in/content/upi-lite
हे पण वाचा :
Investment Tips : ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून 3 वर्षांत जमा करा 10 लाख रुपये
FD Rates : आता ‘या’ 2 बँकांनी देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याजदर तपासा
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 23 वर्षात गुंतवणूकदारांना दिला 259% रिटर्न
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, आजचे दर पहा
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3GB डेटा, अनलिमिडेट कॉलिंग सोबत मिळवा 84 दिवसांची व्हॅलिडिटी