सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
किसनवीर सहकारी सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत भरगोस मतांनी विजय मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांनी जलमंदिर पॅलेस येथे खा. उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी मकरंद पाटलांना प्रेमाची झप्पी दिली तसेच ‘3 कारखाने, जिल्हा बँक, आमदारकी म्हणजे बॉसच की ! बास काय आबा??? जिल्ह्याचा बॉसच, असे म्हणत कौतुक केले.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून लागून राहिलेल्या सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आ. मकरंदआबा पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांनी विजय संपादित केला. तब्बल 19 वर्षांनंतर या ठिकाणी त्यांनी सत्तांतर घडवून आणले.
या विजयानंतर मकरंद आबा यांनी खा. उदयनराजेंची जलमंदिर येथे जाऊन भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी मकरंद आबांना पाहताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आणि आबांना प्रेमाने मिठी मारली. यावेळी उदयनराजेंच्या कौतुकाने मकरंद आबा देखील भारावून गेले. या भेटीवेळी उदयनराजेंनी बॉस बॉस असे म्हंटले. त्यावर मकरंद पाटील यांनी देखील ‘आम्ही कसले बॉस ?’ असे म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यावर लगेच उदयनराजे यांनी ‘३ कारखाने, जिल्हा बँक, आमदारकी म्हणजे बॉसच की! बास काय आबा??? जिल्ह्याचा बॉसच, असे म्हणत जलमंदिर येथे मकरंद आबांचा उदयनराजेंनी सत्कार केला.
हातात हात घेत अर्धा भरवला पेढा…
जलमंदिर येथे आ. मकरंद पाटील यांनी जेव्हा खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. तेव्हा दोघांनी प्रथम एकमेकांना आलिंगन दिले. यानंतर मकरंद आबांनी उदयनराजेंच्या शाल व बुके देऊन सत्कार केला. त्यानंतर तीच शाल घेत उदयनराजेंनी मकरंद आबांचा सत्कार केला. यावेळी दोघांनी एकत्रित बसत एकमेकांचे हात हात घेत घेत मुठी आवळल्या. तर उदयनराजेंनी आपल्या हातातील अर्धा पेढा हा मकरंद आबांना भरवला. दोघांच्या या भेटीची सध्या चांगलीच चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे.