टीम, HELLO महाराष्ट्र | आपल्याला हलवा म्हंटल की तोंडाला पाणी सुटत त्यामुळे आज आपण मक्याचा हलवा कसा बनवायचा ते जाणून घेऊ. याचा नैवदय गणपतीलाही खूप आवडेल.
साहित्य-
४ वाट्या गोड मक्याचे दाणे, १ लिटर दूध, २५0 ग्रॅम खवा, ६ टे. स्पू. साजूक तूप, १ वाटी साखर, ड्रायफ्रूट्सचे काप, वेलची पूड आणि १ वाटी नारळाचा चव.
कृती –
1) मक्याचे दाणे मिक्सरमधून काढावेत. खोवलेला नारळ मिक्सरमधून बारीक करावा.
2) कढईत तूप गरम करावं. तुपात मक्याचा किस टाकून परतावा. किस गुलाबी रंगावर आल्यावर त्यात दूध टाकावं.सारखं ढवळावं. मग त्यात साखर आणि सारखा केलेला खवा टाकावा.
3) नंतर त्यात वाटलेलं नारळ टाकावं आणि परतावं. सर्व मिश्रण नीट एकत्र करून शिजवावं.
4) त्यात ड्रायफ्रूट्सचे काप आणि वेलची पूड टाकावी. मिश्रण गॅसवर असताना गॅस मंद असावा. झाकण ठेवून वाफ आणावी.
5) पाच मिनिटांनी गॅस बंद करा. नैवेद्य दाखवतेवेळी सुंदर डिशमध्ये ठेवून ड्रायफ्रूट्स टाकून हलवा सजवावा