हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असा खळबळजनक गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
ज्यांना 2 दिवसांमध्ये ताडा लागणार होता, त्यांची जमीन जाणार होती ती आपण स्वस्तामध्ये घेतली हे नवाब मलिक यांनी मान्य केले आहे. त्यामुळे एनआयच्या अंडर या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, त्यासाठी नवाब मलिक यांना चौकशी साठी बोलवून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. तसेच यांचे अनेकांशी संबंध आहेत असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार यांच्या नेतृत्त्वातील सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी केलं आहे. त्यानंतर 11 भाजपशासित राज्यांनीदेखील कर कमी केले आहेत. फक्त भाजपशासित राज्यांनीच नाही तर काँग्रेसशासित राज्यांनी देखील इंधनावरील कर कमी केले आहेत. मात्र, ठाकरे सरकारनं कर कमी करण्याचा निर्णय घेतला नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.