मलकापुरात सख्ख्या मुलीने केली जन्मदात्या वडिलांची हत्या

Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मलकापूर : हॅलो महाराष्ट्र – मालकापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सख्खी मुलगी व पुतण्याने संगनमताने छातीत सुरा खुपसून आपल्या 52 वर्षीय वडिलांची हत्या केली आहे. सुभाषचंद्र बोस नगरमध्ये बुधवारी रात्री ९च्या सुमारास हि घटना घडली आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्तीचे नाव गुलाब यादवराव रावणचवरे असे होते.

मृत गुलाब यादवराव रावणचवरे यांचा मुक्ताईनगर बसथांब्यापाठीमागे सुभाषचंद्र बोस नगरात मटका विक्रीचा व्यवसाय होता. बुधवारी रात्री गुलाब रावणचवरे हा दारुच्या नशेत घरात खुर्चीवर बसलेला होता. त्यावेळी त्याची मुलगी लक्ष्मी हरिश्चंद्र सनिसे व पुतण्या प्रकाश साहेबराव रावणचवरे या दोघांनी संगनमताने गुलाबच्या छातीवर धारदार सुऱ्याने सपासप वार केले. यानंतर काही वेळातच गुलाब रावणचवरे याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अमोल कोळी, पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित ठाकूर, पो.काँ.प्रमोद राठोड, पो.काँ.कैलास पवार यांनी करुन आरोपी लक्ष्मी सनिसे व प्रकाश रावणचवरे या दोघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रतनसिंह बोराडे करीत आहेत.