मलकापूर नगरपरिषद निवडणूक; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपा नेते अतुल भोसले यांची मलकापूर नगरपंचायत निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरवात झाली असून कॉंग्रेस आणि भाजप मध्ये जोरदार घुमासान होण्याची शक्यता आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मनोहर शिंदे यांच्या पॅनेल विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे समजले जाणारे भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी स्वतःचे उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे दोघांनी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

दरम्यान, काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी होत असलेली ही निवडणूक म्हणजे कराड मतदारसंघातील रंगीत तालीमच समजली जाते आहे. तसेच सदर निवडणुकीच्या प्रचारावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले हे दोघे ही नेते कराडमध्येच ठाण मांडून बसले होते. एकूण ९ प्रभागात १९ जागांसाठी तब्बल ४५ उमेदवार रिंगणात आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी २ उमेदवार रिंगणात आहेत.

Leave a Comment