हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने उद्रेक केला असून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य जनता संकटात असून याच पार्श्वभूमीवर देशातील सर्व जनतेला मोफत कोरोना लस द्यावी अशी विनंती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. मात्र मोदींकडून यावर कोणतंही उत्तर न आल्याने ममता संतापल्या आहेत.
मोफत लसीकरणाच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींकडून मला अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नाही. नवीन संसद आणि पुतळे बांधण्यासाठी २०,००० कोटी रुपये खर्च करत असताना लसीकरणासाठी ३०,००० कोटी का दिले जात नाहीत?”, असा सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
“पीएम केयर फंड कोठे आहे? मोदी देशातील तरुणांचा जीव धोक्यात का घालत आहेत? त्यांच्या नेत्यांनी कोव्हिड हॉस्पिटलला भेट दिली पाहिजे तर ते इथे येत आहेत. ते इथे येऊन कोव्हिड पसरवत आहेत,” अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.