देशातील पहिलीच घटना : खून करणा-या अल्पवयीन आरोपीस बारा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | मिरज तालुक्यातल्या तुंग येथे झालेल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि खून प्रकरणी नराधम अल्पवयीन 17 वर्षीय मुलास न्यायालयाने दोषी धरून भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३६३, ३७६, ३७६ (अ), ३७६ (अ,ब), ३७७ (अ) तसेच पोक्सो कायदयांतर्गत कलम ४ व ६ खाली दोषी धरून प्रत्येक कलमांसाठी वेगवेगळी बारा वर्षे व प्रत्येक कलमान्वये १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद तसेच बालन्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ७५ अन्वये दोषी धरून एक वर्षे साधा कारावास अशी बारा वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.

या केसची सुनावनी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १ श्री. डी. पी. सातवळेकर यांच्या समोर झाली. निर्भया हत्याकांडानंतर कायदयामध्ये करणेत आलेल्या दुरुस्तीनुसार भारतामध्ये झालेली ही पहिलीच शिक्षा आहे. तुंग येथील अल्पवयीन मुलगी २० मे २०२० रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून बेपत्ता झाली होती. तिचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच गावतील लोकांनी परीसरात तसेच शेतामध्ये रात्रभर शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील शोध घेणा-या लोकांना तिचे प्रेत हाळ भागात सापडले. तिच्या डोक्यात जखमा झालेल्या होत्या. तसेच तिचा पायजमा तिच्या गळयाभोवती गुंडाळलेला होता. सदर बाबतची फिर्याद मुलीच्या वडीलांनी ग्रामीण पोलस ठाण्यात तत्काळ दिली. पोलीसांनी कसून तपास केला असता सदरच्या मुलीस साक्षीदारांनी आरोपी सोबत खेळत असल्याचे पाहिले होते.

पोलीसांनी आरोपीस ताब्यात घेवुन त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने पिडीत मुलीस उसाचे शेतात नेऊन व मोबाईलवरील अश्लील चित्रफित दाखवुन तिच्यावर अनैसर्गीकरित्या बलात्कार केला. त्यानंतर सदरची पीडीत मुलगी रडु लागल्याने आरोपीने तिला खाली पाडून तिचा हाताने गळा आवळला. त्यानंतर सुध्दा तिची हालचाल होत असल्याचे आरोपीच्या लक्षात आले व त्याने तिचा पायजमा गळ्याला अवळुन तिच्या मानेवर पाय ठेवून निर्दयीपणे खून करून पळून गेला. सदर केसची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांच्या न्यायालयात झाली.

Leave a Comment