…तर मोदी ताजमहालही विकतील; ममता दीदींचा मोदींवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांकडे सध्या देशाचं लक्ष आहे. पश्चिम बंगाल मध्ये भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केल्यानंतर ममता दिदींनी देखील मोदींवर पलटवार केला आहे. वेळ आली तर ते ताजमहालही विकतील अशा शब्दांत ममतांनी मोदींवर हल्लाबोल केला.

ममता बॅनर्जी यांनी सिलिगुडीमध्ये एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीविरोधात पदयात्रा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केला. “केंद्र सरकारनं दिल्ली विकली, डिफेन्स, एअर इंडिया, बीएसएनएल अशा अनेक संस्थांना विकलं. उद्या वेळ आली तर ते ताजमहालही विकतील. अस ममता बॅनर्जी म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, परिवर्तन आता बंगालमध्ये नाही तर दिल्लीत होणार आहे. ते म्हणाले बंगालमध्य महिला सुरक्षा नाही. परंतु उत्तर प्रदेश, बिहार आणि अन्य राज्यांकडे पाहा. बंगालमध्ये महिला सुरक्षितच आहेत. कोरोना काळात मी फिरत होत पण मोदी कुठे होते? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like