धक्कादायक ! “मी सततच्या आजाराला कंटाळलो आहे” असे म्हणत तरुणाची आत्महत्या

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – बोंडेगाव येथील एका ३४ वर्षीय युवकाने सततच्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. नितीन केशव राऊत असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हि घटना ३० एप्रिल रोजी घडली आहे. नितीन याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. यामध्ये त्याने आजारपणाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते. नितीन राऊत हा अविवाहित तरुण होता.

घटनेच्या दिवशी म्हणजेच ३० एप्रिलला दुपारपासून तो बेपत्ता होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. त्यानंतर घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरु केली. शेजारीच राऊत यांच्या नवीन घराचे काम सुरु होते. त्या ठिकाणी तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

नितीन हा स्पर्धा परीक्षेची तयारी होता असे गावातील नागरिकांनी सांगितले आहे. तसेच त्याला पोटाचा आजारदेखील होता. काही महिन्यांपूर्वीच पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आजारपण व काही कारणाने तो मानसिकरित्या खचला होता त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस हवालदार गौरकार या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

You might also like