धरणाच्या भिंतीवर स्टंटबाजी करणं पडलं महागात, तरुणाचा तोल गेला आणि….

Stunts
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बंगळुरू : वृत्तसंस्था – अनेक लोकांना स्टंट (Stunts) करण्याची आवड असते पण काही वेळा हाच स्टंट (Stunts) त्यांच्या अंगलट येतो. ज्याचा नंतर त्यांना पश्चाताप होतो. असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका व्यक्तीला आपला स्टंट लोकांना दाखवायचा होता. मात्र स्टंट (Stunts) दाखवत असताना अशी घटना घडली, जी पाहून उपस्थित असलेल्या सगळ्यांना धक्का बसला आहे. कर्नाटकातील चिकबल्लापूरमध्ये एक मोठं धरण आहे, जिथे लोक अनेकदा फिरण्यासाठी आणि धरणातून कोसळणारं पाणी पाहाण्यासाठी येत असतात.

अनेकदा मस्ती करणं अतिशय धोकादायक ठरतं. या घटनेतही असेच काहीसे घडले आहे. ही घटना चिकबल्लापूरच्या श्रीनिवास धरणावर घडली. धरणातून सतत पाणी वाहत राहातं. याच धरणाच्या भल्यामोठ्या भिंतीवर वाहत्या पाण्यावरुन चढण्याचा प्रयत्न एक व्यक्ती करू लागला. तो अर्ध्याहून जास्त अंतर चढलासुद्धा होता आणि खाली उभे असलेले लोक त्याच्याकडे टक लावून पाहत होते.

चिकबल्लापूरच्या श्रीनिवास धरणावर उपस्थित नागरिक पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा आनंद घेत असताना एक तरुण सुमारे 30 फूट चढून गेला. हा एक अतिशय धोकादायक आणि प्राणघातक स्टंट (Stunts) होता. काही अंतर चढून गेल्यावर त्याला तोल न सांभाळता आल्याने तो घसरून खाली पडला. हा व्यक्ती खाली पडल्याचा व्हिडिओ त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. या तरुणाचा जीव वाचला मात्र त्याला मोठी दुखापत झाली. यानंतर या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यवर उपचार सुरु आहेत.

हे पण वाचा :

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार

…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं