म्हसवड प्रतिनिधी | पोपटराव बनसोडे
माण तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून पिण्याच्या पाण्याची अवस्था दयनीय झाली असताना ढाकणी तलाव्यात उरमोडी धरणाचे पाणी गत महिन्यात सोडले होते. मात्र तो कृत्रिम पाणी साठा संपुष्टात आल्याने तलाव्यातील वाॅटर सप्लायची विहिर कोरडी पडू लागल्याने माण वासियांची तहान कशी भागणार याची चिंता माणदेशातील जनतेला लागली आहे.
दुष्काळी परिस्थिती वर मात करण्यासाठी शासन ढाकणी तलाव्यात उरमोडीचे पाणी सोडून वाॅटरस्पलायच्या विहिरीवरून सुमारे 30 गावांना टॅकर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. अनेक गावांना पंधरा दिवसातून एकादा टॅकर येत असल्याने अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेले लोकांची पाण्यासाठी भांडणं होत होती.
आता मात्र ज्या विहिरीतून पाणी पुरवले जाते ती विहिर कोरडी पडू लागल्याने विहिरीवर टॅकर रात्रंदिवस उभे राहत आहेत. या गंभीर परिस्थिती मुळे लोंकांचे हाल होत असून पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबणार कधी अशी विचारणा माणची जनता करत आहे.