पत्नीने पाय दाबून देण्यास नकार दिल्याने पतीने संतापाच्या भरात केले ‘हे’ राक्षसी कृत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा : वृत्तसंस्था – बिहार जिल्ह्यातील जहानाबादमध्ये पती- पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये मखदुमपूरमध्ये एका पतीने पत्नीने पाय दाबण्यास नकार दिल्याने तिची हत्या (man killed wife) करण्यात आली आहे. ही खळबळजनक घटना मखदुमपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील छकोरी बिघा गावामध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
मखदुमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छकोरी बिघा गावात राहणारा मुन्ना शर्मा याने गुरुवारी रात्री पत्नी रिंकी देवीला पाय दाबण्यास सांगितले होते. मात्र, पत्नीने आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगत पाय दाबण्यास नकार दिला यामुळे पती मुन्ना शर्मा याला राग आल्याने त्याने लाकडी दांडक्याने पत्नीच्या डोक्यात वार करून तिची हत्या (man killed wife) केली.

यानंतर गावकऱ्यांनी या घटनेची माहिती मृत रिंकी कुमारीच्या माहेरकडच्यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच रिंकी कुमारीचे वडील सुरेश सिंह यांनी मखदुमपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या मुलीच्या हत्येची (man killed wife) तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृत रिंकी कुमारीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपी पती मुन्ना शर्माला अटक केली.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती