अंध आईसोबत चालणारा मुलगा चालता चालता रेल्वे ट्रेकवर पडला; तितक्यात समोर रेल्वे आली अन्…

 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :अनेक सहसी लोकांचे व्हिडीओ आपण पाहत असतो. मात्र मुंबई मध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह रे पठ्ठया!

मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म वरून जाणाऱ्या लहान मुलाचा तोल गेला आणि हा मुलगा रुळावर पडला. समोरून भरधाव वेगानं रेल्वे घेत होती. या मुला समोर असणारी महिला ही अंध होती त्यामुळे ती काहीच करु शकत नव्हती. अशावेळी प्रसंगावधान राखून पॉईंटमन मयूर शेळके यांनी या लहान मुलाला वाचवलं. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.
प्रसंगावधान राखून मयूर शेळके यांनी या चिमुकल्यांचे प्राण वाचवले. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून मयूर शेळके यांचे कौतुक होत आहे.

You might also like