मुंबईमध्ये भरबाजारात तरुणीवर सपासप वार करून खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कल्याण प्रतिनिधी | मुंबई शहराचे उपनगर असलेल्या कल्याण येथील कांदा बटाटा मार्केटमध्ये गर्दीचा फायदा घेऊन एका तरुणीवर सपासप वार करून तिचा खून करण्याचा प्रकार घडला आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न आजही किती गंभीर आहे हेच सांगणारा आहे आजचा प्रकार होता. दोन हल्लेखोराने तरुणीवर सपासप वार केल्याने तिने तरफडून जागीच प्राण सोडला असे एका प्रत्यक्षदर्शनी व्यक्तीने सांगितले आहे.

सनम करोटिया हि तरुणी कल्याणच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आपल्या मित्राची वाट बघत थांबली असता पाठीमागून येणाऱ्या तरुणांनी तिच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. त्यांचे वार एवढे तीव्र होते कि अवघ्या एक दीड मिनिटातच तिचे शरीर रक्ताने माखले. तरुणीला ठार करून हे तरुण फरार झाले. त्यानंतर मार्केट मधील व्यापारी आणि अडत्यांनी पोलिसांना घटनेची त्यानंतर पोलीस घटना स्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मार्केट मध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात त्यांना तरुणीवर हल्ला करणारे तरुण स्पष्ट दिसले. त्यामुळे तपास सोपा झाला आणि अवघ्या एकच तासात पोलिसांनी या हल्ल्याचा आरोपी बाबू ढकणी याला अटक केली. मात्र त्याचा दुसरा साथीदार अद्याप हि फरार आहे.

बाबू ढकणी आणि खून झालेली तरुणी यांच्यात मैत्री होती. त्यानंतर बाबूचे वर्तन या तरुणीला आवडत नसल्याने त्या तरुणीने त्याच्यासोबतची मैत्री तोडली. तसेच त्याच्याशी बोलणे देखील ती टाळू लागली. याचाच राग मनात धरून बाबू ढकणी याने मित्राच्या मदतीने तरुणीला खल्लास केले असे पोलिसांनी सांगितले आहे.