व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

लग्नानंतर तिचा जीव दुसर्‍यावरच जडला; बदला घेण्यासाठी नवर्‍यानं थेट केलं ‘हे’ कृत्य

पाली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील तखतगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. यामध्ये भरदिवसा एका महिलेचे अपहरण करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास केल्यानंतर नेमका प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात बरलूट येथील निवासी मनोज कुमार प्रजापत याचं जालोर येथील एका महिलेसोबत लग्न झाले होते.

मात्र काही कारणामुळे त्या महिलेने मनोजला घटस्फोट देऊन तखतगड येथील दुसऱ्या तरुणासोबत लग्न केले. याचा मनोजला खूप राग आला. यानंतर त्याने आपल्या पत्नीचा सूड घेण्यासाठी एक प्लॅन आखला. त्यानुसार तो शनिवारी काही सहकाऱ्यांसोबत तखतगड येथील आपल्या पहिल्या पत्नीच्या घरी पोहोचला. यावेळी महिला घरात एकटी होती. मात्र मनोजने तिला धमकी देत स्वत:सोबत गाडीत बसवून नेलं.

या महिलेचे अपहरण झाल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी जालोर भागात नाकाबंदी केली. यावेळी मुलेगा गावात गाडी थांबवून या महिलेला पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवले. यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी मनोजला अपहरणाच्या आरोपाखाली अटक केली आहे. मनोजसह अन्य दोन आरोपींनासुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.