तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं? अशा शब्दांत मानसी नाईकने युझरला सुनावले खडे बोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मराठी अभिनेत्री मानसी नाईक हि आपल्या अभिनय, नृत्य यासोबतच खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. तिने काही महिन्यांपूर्वीच लग्न केले आहे. कलाकारांना खाजगी आयुष्यामुळे ट्रोल करण्यात येते. काही कलाकार या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत असतात. पण मानसी नाईकसारखे काही कलाकार ट्रोल करणाऱ्या युझरला सडेतोड उत्तर देत असतात. असेच एका व्हिडिओमधून मानसी नाईकने शिवीगाळ करणाऱ्या एका युझरला चांगलेच सुनावले आहे.

काय आहे प्रकरण
मानसीने एका लाइव्ह सेशनमध्ये भाग घेतला होता. एका युझरने मानसीच्या पोस्टवर घाणेरड्या कमेंट केल्या होत्या.मानसी नाईकने या युझरला लाईव्ह सेशलमध्ये उत्तर देत त्याला चांगलेच सुनावले आहे. मानसी नाईक आपल्या व्हिडिओमध्ये म्हणाली, ‘तुम्ही मला बुधवार पेठेत कधी बघितलं? आणि तुम्ही तिथे काय करत होतात? बुधवार पेठ ही जागा ज्या स्त्रिया चालवतात त्या स्वतःच्या पोटापाण्यासाठी ते काम करतात. त्या त्यांच्या हिमतीवर जगतात. प्रामाणिकपणे काम करतात. त्या स्त्रिया तिथे का आल्या असं तुम्हाला वाटत?तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही काम करून खा. पण दुसऱ्यांना अशा भाषेत शिव्या घालून काय मिळतं?’ असे अनेक प्रश्न विचारत तिने त्या युझरला खडे बोल सुनावले.

https://www.instagram.com/p/CODh-U5hS12/?utm_source=ig_embed

मानसी नाईकचे काही महिन्यांपूर्वी बॉक्सर प्रदीप खरेरासोबत लग्न झाले आहे. तिच्या लग्नावरुन अनेक जणांनी तिला ट्रोल केले आहे. तुला मराठी मुलगा भेटला नाही का? असे प्रश्न विचारत तिला ट्रोल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी अभिनेता शशांक केतकर यालासुद्धा अशा प्रकारे ट्रोल करण्यात आले होते. तेव्हा शशांकने देखील त्या युझरला चांगलेच सुनावले होते. अशा युझर्सचा बेशिस्तपणा आम्ही सहन करून घेणार नाही, अशा शब्दांत त्याने त्या युझरला खडसावले होते. अनेकदा बॉलिवूडमधील अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसोबत मानसी नाईकची तुलना करण्यात आली आहे.

Leave a Comment