शिरूर प्रतिनिधी | राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र सध्या बघायला मिळत आहे. कारण राष्ट्रवादीचे बडे नेते तर पक्ष सोडतच आहेत. त्याच प्रमाणे छोटे कार्यकर्ते देखील या पक्षांना सोडून चालले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल हे देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते आहे.
मंगलदास बांदल यांनी राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली असून ते राष्ट्रवादी कडून सध्या शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात उमेदवारीची मागणी करत आहेत. आशचत त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत बंद खोलीत एक तास चर्चा केली आहे. त्यांच्या या चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला आहे.
पत्रकारांशी साधलेल्या संवाद बांदल म्हणले की मी राष्ट्रवादीकडून शिरूर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी मागणी करत आहे. मी सध्या तरी राष्ट्र्वादीतच आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. त्यांच्यासोबत अन्य विषयावर चर्चा झाली आहे. सध्या तरी शिवसेना प्रवेशाचा विचार नाही. मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असे बांदल म्हणाले. त्याच प्रमाणे त्यांनी आपण मुख्यमंत्र्यांसोबत देखील अर्धातास चर्चा केली आहे असे म्हणले आहे.