वटपौर्णिमेलाच चोरांनी हिसकावले सौभाग्याचे लेणे; तीन घटनांनी हादरले शहर

0
27
mangalsutra theft
mangalsutra theft
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | वटपौर्णिमेनिमित्त घराबाहेर पडलेल्या शिक्षिकेसह दोन गृहिणींचे सौभाग्याचे लेणे दुचाकीवर आलेल्या दोन चोरांनी हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात पुन्हा एकदा मंगळसूत्र चोरांनी डोकेवर काढल्याचे दिसून येत आहे. ही घटना गुरुवारी शहरातील महानुभाव आश्रम, समर्थनगरातील सुंदर लॉज आणि एमआयडीसी वाळुज परिसरातील सिडको महानगरात  घडली.

या घटनेमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वटपौर्णिमेला वडाची पुजा करण्यासाठी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास एमआयडीसी वाळुज, सिडको महानगर परिसरातील गणेशनगर येथील महिला निलीमा मधुकर पोखरकर (वय38) रा. नंदनकानन हाऊसिंग सोसायटी या पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरांनी त्यांच्या गळ्यातील सहा तोळ्यांचे गंठण हिसकावून पळ काढला. तत्पुर्वी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुजेसाठी समर्थनगरातील निर्मनुष्य असलेल्या सुंदर लॉजसमोरुन जात असलेल्या स्वाती सुरेश काळेगावकर (वय 52) रा. समर्थनगर, नरसिंग कृपा निवास यांच्या पाठीमागून विनाक्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी चार तोळे अडीच ग्रॅमचे गंठण हिसकावून पळ काढला.

याशिवाय पुजेचे साहित्य आणण्यासाठी सकाळी साडेअकराच्या सुमारास शिक्षीका कविता दलसिंग घुण (वय 34) रा. अमृतधारा सोसायटी, कांचनवाडी या दुचाकीने महानुभाव आश्रम रस्त्यवरुन जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर ट्रिपलसीट आलेल्या चोरांंनी कविता यांच्या गळ्यातील 15 ग्रॅमचे गंठण हिसकावले. यावेळी कविता यांनी आरडाओरड केली. मात्र, चोरांनी राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने धुम ठोकली. सुदैवाने कविता या जखमी झाल्या नाही. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here