नवी दिल्ली |राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आपल्या पदाचा राजीनामा देण्याची जणू स्पर्धात सुरु झाली आहे. अशातच मणिपूरच्या काँग्रेसच्या १२ आमदारांनी राजीनामा दिल्याने चांगलीच राजकीय खळबळ माजली आहे.
मणिपूर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष गैखंगम यांच्याकडे मणिपूर मधील १२ आमदारांनी एकाचवेळी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.मागील दोन दिवसात गुजरात काँग्रेसमध्ये देखील अशीच राजीनामा देण्याची स्पर्धा जोरदार सुरु झाली आहे. काँग्रेसचे आमदार आणि गुजरातचे ओबीसी नेते अल्पेश ठाकूर यांनी काँग्रेसचे १५ आमदार राजीनामे देतील असे भाकीत केले आहे. अशातच मणिपूरमधील हा ताजा प्रकार बघता काँग्रेस मध्ये लोकसभा निकालाने नेते देखील अस्थिर झाले आहेत असे एकंदर चित्र आहे.
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2EDyi7e
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
गिरीश महाजन महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री !
मोदींचे मंत्रिमंडळ तयार ; हि आहेत त्यांच्या मंत्री मंडळातील नावे
विधान परिषद पोटनिवडणूक | भाजपकडून पृथ्वीराज देशमुखांचा अर्ज दाखल
सुप्रिया सुळेंनी दिली चारा छावणीला भेट