हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil Mumbai Morcha । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखोंच्या संख्यने मराठा बांधव मुंबईला गेला आहे. मराठा बांधवांच्या मोठ्या संख्यने मुंबईतील सीएसएमटी परिसरासह संपूर्ण दक्षिण मुंबई पॅक झाली आहे. रस्त्यांवरील गाडयांनाही जागा नाही अशी परिस्थिती झाली आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील काही रस्ते बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे वाहतुकीतील हे बदल पाहूनच मुंबईकरांनो घराबाहेर पडा.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर मराठा बांधवांची मोठी गर्दी (Manoj Jarange Patil Mumbai Morcha) होत आहे. त्यामुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबत ट्विट करत म्हंटले कि, उद्या सकाळी सुरू असलेल्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईकडे जाताना वाहतूक मंदावण्याची आणि कधीकधी अडथळा येण्याची शक्यता आहे. गैरसोय कमी करण्यासाठी वाहतूक चौकांवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे .
उद्या सकाळी सुरू असलेल्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईकडे जाताना वाहतूक मंदावण्याची आणि कधीकधी अडथळा येण्याची शक्यता आहे. गैरसोय कमी करण्यासाठी वाहतूक चौकांवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे . #MTPTrafficUpdate
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 31, 2025
कोणकोणते रस्ते बंद? Manoj Jarange Patil Mumbai Morcha
१) मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतूकीसाठी बंद राहणार आहेत.
२) जे.जे उड्डाणपुला मार्गे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या मुंबई पोलिस आयुक्तालयामार्गे पुढे मेट्रो जंक्शन किंवा चर्चगेट स्थानक मार्गे पुढे जाऊ दिले जाणार.
३) मेट्रो जंक्शन ते सीएसएमटीच्या दिशेने येणारा आझाद मैदानच्या मुख्यद्वाराजवळील मुंबई महानगरपालिका मार्ग हाही बंद ठेवला जाणार आहे.
४) हजारीमल सोमानी रोड जो फॅशनस्ट्रीटहून CSMT कडे येणारा आणि आझाद मैदानला लागून असलेला मार्गही बंद असणार आहे.
५) हुतात्मा चौकाहून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत.
६) मंत्रालयासमोरील मॅडम कामा रोड ते मरीनड्राईव्ह जंक्शन मार्गही सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण मुंबईतील वाहतुकीच्या या महत्वाच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना वाढीव फोर्सही देण्यात आली आहे. वडाळा वाहतूक पोलिसांना 35 तर आझाद मैदान पोलिसांना 35 अशी 70 जणांची वाढीव कुमक देण्यात आली आहे.




