हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी जरांगे यांच्या निधनाची बातमी व्हायरल होत होत्या, याबाबत विचारलं असता जरांगे पाटलांनी सरकारवरच आरोप केला आहे. सरकारलाही माझा घातपात व्हावं असं वाटत असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे. पण मी भीत नाही. समोर ये.. कचका दाखवतो असा इशाराही जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला.
आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितलं कि, अंतरवलीमधून मला हलू देत नाहीत. मी तिथे आंदोलन करतो. कुणी मला मारून टाकीन म्हणतो. कुणी गोळ्या घालीन म्हणतो… सरकार, पोलीस मराठ्यांच्या विरोधात आहे. सोशल मीडियावर कोणी काहीही लिहितं. सरकार, पोलीसही मराठ्यांविरोधात असल्यासारखे वागतात. त्यांच्या हातात आहे सारं. ते अशा गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. सरकारलाही, पोलिसांनाही वाटत असेल घातपात झाला पाहिजे, म्हणून आमच्याकडे लक्ष देत नाही. पण मी भीत नाही. समोर ये.. कचका दाखवतो. आमचे लई हल आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, पोलीस तसेच सरकार इतर प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करतं मात्र मराठ्यांसंदर्भातील प्रकरणांमध्ये एवढी तत्परता दाखवली जात नाही . उलट दुसऱ्यांच थोडं काही झालं की लगेच पोलीस कारवाई करतात . मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं, यासाठी प्रयत्न करा. इकडे मराठा आमदार खासदार येतंय. पत्र द्यायला लागले आहे. महाराष्ट्र समाज बघत आहे. जे येत नाही ते विरोधी आहे का? असा प्रश्न पडतो. मात्र मी ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.